निगडी-देहूरोड रस्त्याचे 90 टक्‍के काम पूर्ण; जूनअखेरीस खुला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

निगडी - निगडी ते देहूरोड रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. देहूरोड येथील पुलाचे काम वगळता नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. जूनअखेर हा रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीस उपलब्ध होणार आहे. 

निगडी - निगडी ते देहूरोड रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. देहूरोड येथील पुलाचे काम वगळता नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. जूनअखेर हा रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीस उपलब्ध होणार आहे. 

निगडी ते देहूरोड; तसेच देहूरोड येथील गुरुद्वारा ते देहूरोड पोलिस ठाण्यापर्यंत रस्त्याचे काम नव्वद टक्के झाले आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत हे काम केले जात आहे. 1 फेब्रुवारी 2016 रोजी कामास सुरवात झाली. काम संपविण्याची मुदत 2 जून 2018 आहे. दुपदरी हा रस्ता चौपदरी झाल्याने या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. पाच किलोमीटरच्या रस्त्याची रुंदी आता दोन्ही बाजूने 9-9 मीटर आहे. काम मेअखेर पूर्ण होणार आहे. पुलाचे काम जूनअखेर मार्गी लागणार असल्याने या रस्त्याचा जुनअखेर पूर्ण क्षमतेने वापर होणार आहे. 

पिंपरी-चिंचवडला जोडणारा व पुढे पुण्यापर्यंत असणाऱ्या या जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण येत होता. रुंदीकरणामुळे वाहतूक विनाखोळंबा होणार आहे. रस्त्यासाठी 99 वृक्षांची अधिकृत कत्तल करण्यात आली. 26 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. कॅंटोन्मेंटच्या हद्दीत सहाशे झाडे लावल्याचा दावा रस्ते विकास महामंडळाने केला आहे. 

दृष्टिक्षेपात रस्ता 
* भक्ती-शक्ती चौक ( किमी 20.400) ते देहूरोड पोलिस ठाणे (किमी 26.540) झाला चौपदरी 
* देहूरोड येथे लोहमार्गावर 1 किमी उड्डाण पूल 
* रस्त्याचे काम नव्वद टक्के पूर्ण 
*दुभाजक आणि पथदिव्यांचे काम सुरू 

रुंदीकरणातील वृक्षांबाबत... 
रस्ते विकास महामंडळाविरोधात हरित लवादापुढे विषय प्रलंबित 
विविध पर्यावरणप्रेमी संघटना वृक्षांबाबत आक्रमक; 199 वृक्षांबाबत वाद 
99 वृक्षांची झाली कत्तल 
26 वृक्षांचे पुनर्रोपण; सहाशे रोपे लावली. 
8 वृक्षांचे भवितव्य अंधारात 

Web Title: 90 percent of Nigdi-Dehuroad road work complete