दिलासादायक : पुण्यातील ९४ टक्के  रुग्ण बरे होऊन घरी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९मार्चला आढळला.त्यानंतर गेल्या सात महिन्यांमध्ये पुण्याने कोरोनाचा भयंकर उद्रेक अनुभवला.त्यानंतर आता पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे

पुणे - पुण्यातील ९४ टक्के रुग्ण कोरोनातून खडखडीत बरे होऊन घरी गेले. गेल्या २३३ दिवसांमध्ये एक लाख ५० हजार ३६० रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती महापालिकेतर्फे बुधवारी देण्यात आली. 

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्चला आढळला. त्यानंतर गेल्या सात महिन्यांमध्ये पुण्याने कोरोनाचा भयंकर उद्रेक अनुभवला. त्यानंतर आता पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

हेही वाचा :  नेटवर्क, वीज समस्येमुळे लाइव्ह शिक्षण नको; विद्यार्थ्यांचे मत

शहरात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाचे २८८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या एक लाख ६० हजार ३७४ पर्यंत नोंदली गेली. त्यापैकी एक लाख ५० हजार ३६० रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. हे सर्व रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. त्यापैकी ४४१ रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आले. पुण्यात १८ ते २४ सप्टेंबर दरम्यान कोरोनाच्या संसर्गाचा दर २८.२ टक्के होता. तो आता १२.२ टक्‍क्‍यांपर्यंत कमी आला आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील मृत्यूदर मार्चमध्ये २.६३ टक्के होते. मेपर्यंत ते सातत्याने वाढत ४.६२ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले. त्यानंतर मृत्यूदर नियंत्रित करण्यात शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले. जुलैमध्ये हा दर १.८१ टक्‍क्‍यांपर्यंत कमी आला होता. मात्र, गेल्या तीन महिन्यांपरासून तो आता २.४१ ते २.४९ टक्‍क्‍यांदरम्यान आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 94 percent patients in Pune have recovered and are at home

Tags
टॉपिकस