नेटवर्क, वीज समस्येमुळे लाइव्ह शिक्षण नको; विद्यार्थ्यांचे मत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

‘ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही, कधी रेंज असते तर कधी नाही, त्यामुळे ऑनलाइन क्‍लासमध्ये अडथळे येतात. तसेच विजेचा लपंडावही सुरू असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण हवे असले तरी ते लाइव्ह नको. त्यांच्या सवडीने व्हिडिओ पाहून अभ्यास करता आला पाहिजे, असा कौल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. या सर्वेक्षणात ५१.७ टक्के विद्यार्थ्यांनी वीजपुरवठा व्यवस्थित नसल्याचे नमूद केले आहे, तर ६३.२ टक्के विद्यार्थ्यांनी नेटवर्कबद्दल तक्रारी केल्या आहेत.

पुणे - ‘ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही, कधी रेंज असते तर कधी नाही, त्यामुळे ऑनलाइन क्‍लासमध्ये अडथळे येतात. तसेच विजेचा लपंडावही सुरू असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण हवे असले तरी ते लाइव्ह नको. त्यांच्या सवडीने व्हिडिओ पाहून अभ्यास करता आला पाहिजे, असा कौल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. या सर्वेक्षणात ५१.७ टक्के विद्यार्थ्यांनी वीजपुरवठा व्यवस्थित नसल्याचे नमूद केले आहे, तर ६३.२ टक्के विद्यार्थ्यांनी नेटवर्कबद्दल तक्रारी केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठातील मानवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शंतनू ओझरकर आणि इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी हे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये विविध अभ्यासक्रमाच्या १ हजार ८५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ऑनलाइन शिक्षणात मोबाईल, लॅपटॉप हे अनिवार्य आहेच. पुणे विद्यापीठातील ७७ टक्के विद्यार्थ्यांकडे स्वतःचा स्मार्ट फोन आहे. तर १९.८ टक्के विद्यार्थी हे त्यांच्या घरातील इतर सदस्यांच्या मोबाईलवर अवलंबून आहेत. ३.२ टक्के जणांकडे स्मार्टफोनच नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

अखेर पुणे विद्यापीठाचं ठरलं; बॅकलॉगची परीक्षाही होणार ऑनलाइन!

चार तासांपेक्षा जास्त क्‍लास नको 
ऑनलाइन शिक्षणात किती वेळ स्क्रीन समोर बसायचा हा कळीचा मुद्दा आहेच. याबाबत विद्यार्थ्यांना दिवसभरातून जास्तीत जास्त चार तास क्‍लास व्हावेत असे वाटत आहे. रोज एक तास १५.४ टक्‍के, दोन तास ३१.८, तीन तास १८.४, चार तास १४ टक्के, दिवसभरात पाच तास क्‍लास असावे असे ७.४ टक्के विद्यार्थ्यांना वाटते. १०० टक्‍क्‍यांपैकी ८७.९ टक्के जणांनी १ ते ५ तास या वेळेला कौल दिला आहे. त्यात प्रामुख्याने दोन ते चार तास शिक्षण घेण्यास जास्त पसंती आहे. 

महत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या

अभ्यास गटाच्या सूचना 

  • झूम कॉल, गुगल मीट यांसारख्या लाइव्ह लेक्‍चरऐवजी १० ते १५ मिनिटांचे व्हिडिओ पाठवावेत. 
  • स्मार्टफोनमध्ये व्हॉट्‌सॲप, यूट्यूबचा वापर विद्यार्थी करतात, त्यातून शिक्षण देणे शक्‍य. 
  • थिअरीपेक्षा प्रात्यक्षिक आणि संकीर्ण प्रश्‍नसंग्रह सोडविण्यावर भर द्यावा
  • विद्यापीठ आवारातील विद्यार्थी टेक्‍नोसॅव्ही झाले आहेत. याच कार्यप्रणालीचा वापर विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांनी करावा. 
  • ऑनलाइन शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन व डेक्सटापॅकसाठी अनुदान द्यावे. 

डिजिटल माध्यम वापरणारे विद्यार्थी (आकडे टक्‍क्‍यांत)
स्मार्टफोन

  स्वतःचा - ७७.७७ 
  इतरांचा - १९.८ 
व्हॉट्‌सॲप - ९३.८ 
यूट्यूब - ९३ 
फेसबुक-इंस्टा - ३९ 
अखंडित वीजपुरवठा - ४७.८ 
नेटवर्कची समस्या - ६३.२ 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opinion of students not wanting live education due to network power problem