Corona Updates: पुणे जिल्ह्यात एका दिवसात आढळले 966 नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

पुणे जिल्ह्यात आजअखेरपर्यंत 15 लाख 95 हजार 514 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.26) 966 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 430 जण आहेत. दिवसभरात 9 हजार 772 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. याशिवाय 725 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण आजही कमीच आहे. अन्य 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत IISERचा बोलबाला; हिवतापावरील संशोधनाला मिळालं गोल्ड मेडल!​

दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील तीन, पिंपरी चिंचवडमधील 13,
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सात आणि नगरपालिका व कॅंन्टोन्मेंट बोर्ड
क्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 87 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 6 हजार 868 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. यामुळे पुणे
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 39
हजार 562 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 20 हजार 418 कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 353 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 397 रुग्ण आहेत.

Nivar Cyclone: तिरुमला मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; मुसळधार पावसाने आंध्रात पूरस्थिती!

गुरुवारी पिंपरी चिंचवडमध्ये 231, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 230, नगरपालिका क्षेत्रात 70 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 5 नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही बुधवारी (ता.25) रात्री आठ वाजल्यापासून गुरुवारी (ता.25) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 16 लाख चाचण्या
पुणे जिल्ह्यात आजअखेरपर्यंत 15 लाख 95 हजार 514 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 8 लाख 3 हजार 871 चाचण्यांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 4 लाख 59 हजार 929, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 2 लाख 42 हजार 197, नगरपालिका क्षेत्रात 69 हजार 611 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 19 हजार 906 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 966 new corona patients found In Pune on Thursday 26th November