आंतरराष्ट्रीय स्पर्धेत IISERचा बोलबाला; हिवतापावरील संशोधनाला मिळालं गोल्ड मेडल!

IISER_Pune
IISER_Pune

पुणे : जनुक अभियांत्रिकीशी निगडित इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर मशिन (आयजीइम) स्पर्धेत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचा (आयसर) दबदबा पाहायला मिळाला. आयसर पुणेसह तिरुपती आणि ब्रह्मपुरीच्या आयसरने सुवर्णपदक पटकावले आहे. पोस्टर प्रेझेंटेशन, कार्यशाळा, नेटवर्किंग इव्हेंट आदींचा समावेश असलेल्या या स्पर्धेत जगभरातील 250 जणांचा चमू सहभागी झाले होते. 

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या या स्पर्धेत आयसर पुणेचे 14 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यात त्यांनी हिवतापासंबंधीचे संशोधन सादर केले. रविवारी (ता.22) पार पडलेल्या ऑनलाईन पारितोषिक वितरण समारंभात कृत्रिम जीवशास्त्रातील उपयोजित संशोधनाबद्दल आयसर पुणेला सुवर्णपदक तर मिळालेच त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट चमुचा सन्मानही प्राप्त झाला आहे. 

आयसर पुणेचे हिवतापावरील संशोधन :
1) निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय : हिवतापाच्या निदानासाठी कार्यक्षम आणि स्वस्त निदान किट विकसित करण्यात आले आहे. सॉफ्टवेअर आधारित या निदान किटची अचूकता 95.45 टक्के असून, रक्तद्रव्याच्या प्रतिमेचा यामध्ये उपयोग करण्यात आला आहे. फोल्डस्कोप या सुक्ष्मदर्शिका आणि पेपर सेंट्रीफ्यूज या उपकरणाच्या साहाय्याने आपण ही प्रतिमा मिळवू शकतो. 

2) उपचार : मानवी शरीरातील हिवतापाचा प्रसार थांबविण्यासाठी तोंडावाटे देण्यात येणाऱ्या प्रथिनांच्या साखळीचा शोध या युवा संशोधकांनी लावला आहे.

कोरोना काळातील हे संशोधन बघता विद्यार्थ्यांच्या गटाचे अभूतपूर्व यश आहे. विद्यार्थ्यांनी जे मॉडेल विकसित केले त्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेत मिळविणे सर्वाधिक आव्हानात्मक गोष्ट होती. केवळ सुवर्ण पदक नाही तर सर्वोत्तम चमूचा सन्मान विद्यार्थ्यांनी प्राप्त केला आहे. 
- प्रा. संजीव गलांडे 

इतर वर्षांच्या तुलनेत यंदा अनेक आव्हाने असतानाही आमच्या चमूने अतुलनीय काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून या स्पर्धेत आयसरचा सहभागी होत असून, आता एक प्रकारचे संशोधनाचे वातावरण तयार झाले आहे. 
- वर्षा जयसीम्हा, बीएस-एमएसची विद्यार्थी आणि आशियाची ब्रॅंड ऍम्बॅसिडर

आम्ही स्पर्धेसाठी जो विषय निवडला त्यातील संशोधनासाठी भविष्यात खूप संधी आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वांशी ऑनलाईन पद्धतीने संपर्कात राहणे आणि काम पुढे नेने निश्‍चितच आव्हानात्मक होते. 
- चिन्मय पटवर्धन, विजेत्या संघाचा प्रमुख, आयसर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com