esakal | विजेची तार अंगावर कोसळल्याने उंब्रजमध्ये अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

died boy
विजेची तार अंगावर कोसळल्याने उंब्रजमध्ये अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू
sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

पिंपळवंडी : उंब्रज नं. १ (ता. जुन्नर) येथील दोनरस्ते या शिवारात सोमवारी (ता. १९) संध्याकाळी विजेच्या पोलवरील तार अचानक तुटून अंगावर पडल्याने अर्जुन मंगेश पवार (वय ११) या मुलाचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे अर्जुन त्याच्या आई-वडिलां सोबत मच्छीमारीसाठी गेला होता.सायंकाळच्या सुमारास त्याला भुक लागल्याने तो खाऊ आणण्यासाठी घरी गेला व कपडे घालून गावाच्या दिशेने जात असताना घराच्या काही अंतरावर असलेल्या विजेच्या पोलवरील तार अचानक तुटली आणि त्याच्या अंगावर पडली व शॉक लागून त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा: ‘आरटीई’ बोगस अर्ज प्रकरण जाणार पोलिसांकडे

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हि दुर्दैवी घटना घडली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.सदर घटनेची माहिती मिळताच ओतुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच महावितरणचे अधिकारी सिद्धार्थ सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन घटनेची माहिती घेतली. उंब्रजचे सामाजिक कार्यकर्ते उमेश दांगट यांनी पिडित कुटुंबासाठी आर्थिक मदतीची मागणी केली.विकास हांडे यांनी महावितरणच्या गलथान कारभारा बद्दल नाराजी व्यक्त केली.चंदु हांडे,बंटी हांडे,वैभव हांडे,अक्षय शिंगोटे, राजाभाऊ हांडे,संजय हांडे,पोपट चौधरी यांनी महावितरणच्या समस्या अधोरेखित केल्या.

हेही वाचा: पुण्यात जनरल मोटर्सने 1419 कामगारांना नोकरीवरुन काढलं

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, सभापती विशाल तांबे व पंचायत समिती सदस्य शाम माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच आदिवासी कुटुंबांची होणारी हेळसांड थांबवावी यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी शाम माळी यांनी केली. यावेळी पिडित कुटुंबाला आर्थिक मदत करणार असल्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.उंब्रजच्या लोकनियुक्त सरपंच सपना दांगट यांनी सदर आश्वासन एक महिन्याच्या आत पूर्ण न झाल्यास तसेच महावितरणबाबतच्या तक्रारिंचे निवारण आठ दिवसांत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.