esakal | तब्बल एकवीस जणांच्या कुटुंबियांनी केली कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

covid19
तब्बल एकवीस जणांच्या कुटुंबियांनी केली कोरोनावर मात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मांडवगण फराटा : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा(coronavirus) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना कोरोनाचा कोणत्याही माध्यमातून कुटुंबापर्यंत शिरकाव होत आहे. मांडवगण फराटा (ता. शिरुर) (mandavagan village) येथील तब्बल एकवीस व्यक्तींचं संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह(covid positive) आले होते. यातील वयोवृद्ध, लहान मुले यांच्यासह सर्व कुटुंबाने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. (a family of twenty-one people recovered from the corona infection.)

मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक रोहिदास जगताप यांच्या कुटुंबात लहान-मोठ्या एकवीस व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या शेतात खरबुजाचे पीक घेतले होते. त्यामुळे खरबुजाची विक्री करण्यासाठी त्यांना सतत मार्केट यार्ड तसेच गावा बाहेर जावे लागत होते. परिणामी त्यांचा वेगवेगळे व्यापारी, कामगार, ग्राहक यांच्याशी संपर्क येत होता. त्यातून त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. बाहेर गावी गेल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले होते परंतु तरीही घरातील सर्व व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या होत्या. आई, वडील, चुलते, चुलती, भाऊ, भावजया, पुतणे, मुले आदी एकवीस व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी न घाबरता परिस्थिती व्यवस्थित हाताळली.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्ग वाढला; मृत्यूदर घटला

यातील काही रुग्णांवर मांडवगण फराटा येथील कोवीड केअर सेंटर मध्ये, काहींवर वरदविनायक हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. कमी लक्षणे असलेल्यांना घरीच विलगीकरणात ठेवून औषधोपचार करण्यात आले. संपूर्ण कुटुंब योग्य औषधोपचार, जबरदस्त इच्छा शक्ती, जिद्द, योग्य व्यायाम, सकस आहार यांच्या जोरावर कोरोनामुक्त झाले आहे. घरातील अगदी सहा महिन्यांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची लक्षणे दिसताच अँटिजेन चाचणी करुन त्वरित उपचार सुरु करणे गरजेचे आहे. आजही अनेकजण आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे लपवून ठेवतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून उपचार घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. अंगावर दुखणे काढणे चुकीचे आहे

-अशोक जगताप.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात