फुले दाम्पत्याचं एकत्रित स्मारक होणार; भुजबळांची माहिती : Phule Smarak | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Phule Smarak

Phule Smarak: फुले दाम्पत्याचं एकत्रित स्मारक होणार; भुजबळांची माहिती

मुंबई : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यात काही अंतरावरच वेगवेगळी स्मारकं आहेत. पण आता त्यांच्या स्मारकांचाही प्रश्न मार्गी लागला असून या स्मारकांना जोडणाऱ्या रस्त्याचे भूसंपादन तातडीनं करण्यात येऊन लवकरच फुले दाम्पत्याचं एकत्रित स्मारक होईल, अशी माहिती मुख्यमत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी दिली. (a joint memorial of Mahatma Jyaotirao Phule and Savitribai Phule will happen says Chhagan Bhujbal)

हेही वाचा: Coronavirus: चीनमधल्या BF.7 व्हेरियंटची महाराष्ट्रात नोंद नाही - तानाजी सावंत

भुजबळ म्हणाले, सन १९९२ साली शासनानं पुणे शहारातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राहते घर राष्ट्राला अर्पण करून ही वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. हे स्मारक व त्याच्या परिसराचे नूतनीकरण व जतन करण्यासाठी आवश्यक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेली आहेत.

हेही वाचा: Jain Samaj Bandh: बारामतीनंतर पुण्यातही जैन समाजानं पाळला बंद! जाणून घ्या कारण

व्हीआयपी व्हिजिट पण गैरसोय

महात्मा फुले यांच्या राज्य संरक्षित स्मारकाशेजारी दिडशे मीटर अंतरावर पुणे महानगरपालिकेच्या मिळकतीमध्ये महानगर पालिकेमार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं काम करण्यात आलेलं आहे.

या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्याचंही नियोजित आहे. तिथं राहणाऱ्या रहिवाशांचं अन्यत्र पुनर्वसन करून रस्ता करण्याचं प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणं फुले वाड्याच्या आजूबाजूला राहत असलेल्या काही नागरिकांच्या जागा संपादित करून या स्मारकाच्या विस्तारासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

या स्मारकांना वर्षभर राष्ट्रीय नेते व अतिमहत्वाच्या व्यक्ती भेटी देण्यासाठी येत असतात. मात्र येथे वाहतुक व वाहनतळासाठी प्रशस्त जागा नसल्यानं व नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळं या दोन्ही स्मारकांचा विस्तार आणि या वास्तूंसाठी जोडरस्ता तातडीनं विकसित करण्याची गरज असल्याची मागणी या बैठकीत भुजबळांनी केली.

हे ही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

लवकरच एकत्रित स्मारक होणार - आयुक्त

या बैठकीत पुणे महापालिका आयुक्त म्हणाले, विभागानं आरक्षणात बदल केले आहेत. याठिकाणी ३६ झोपडपट्टी धारक होते, त्यांचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. त्यामुळं तातडीने याठिकाणी भूसंपादन करण्यात येऊन लवकरच महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित स्मारक होईल.

टॅग्स :Savitribai PhulePune News