Pune: पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune: पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग

Pune: पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग

पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग लागली. एका इमारतीत हे हॉटेल ७ व्या मजल्यावर असल्यामुळे आगीचे लोण पसरत आहे. आग इतकी भीषण आहे यामुळे टेरेसचेही मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोंढव्यातील लुल्लानगर चौक परिसरातील ही घटना आहे. मंगळवारी सकाळीच या इमारतीच्या वरच्या भागातील मजल्यांवरून आधी धुर निघाल्याचं प्रत्यक्ष दर्शींना दिसलं. त्यानंतर याच ठिकाणाहून मोठ-मोठे आगीचे लोळ उठताना दिसले. आग पसरू नये यासाठी पायत्न करण्यात येत आहेत.

आग लागलेल्या इमारतीत अनेक दुकाने, ऑफिस, आणि सोन्याची दुकाने आहेत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हॉटेलच्या आतमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण आग भीषण असल्यामुळे हॉटेलच्या आतमध्ये प्रवेश करताना अडथळे निर्माण होत आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोणतीही जीवित हानी झाली नाही.