Pahalgam Attack : क्षणांनी वाचवले प्राण; नाहीतर आम्ही देखील हल्ल्यात सापडलो असतो
Tourist Safety : जुन्नर येथील अभिजित व रोहिणी रोकडे हे पहलगामला जाण्याआधी अचानक दुधपथरी येथे थांबले, आणि त्यामुळे ते दहशतवादी हल्ल्यापासून थोडक्यात वाचले. त्यांच्या या थरारक अनुभवाने सुटकेचा सुस्कारा टाकला आहे.
जुन्नर : काश्मीरच्या पर्यटन दौऱ्यात गुलमर्ग करून नियोजनानुसार पहलगामला जाण्यापूर्वी आम्ही दुधपथरीला थांबलो अन्यथा आम्ही देखील हल्ल्यात सापडलो असतो अशी भावना जुन्नर येथील पर्यटक अभिजित व रोहिणी रोकडे यांनी दूरध्वनीवरून 'सकाळ' शी बोलताना व्यक्त केली.