esakal | नारायणगाव : खेबडेमळा शिवारात विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

 well
नारायणगाव : खेबडेमळा शिवारात विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
sakal_logo
By
रविंद्र पाटे

नारायणगाव : येथील खेबडेमळा शिवारात वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या सुरेश सखाराम घाडगे ( वय ४०) या भंगार व्यवसायिकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. तरुणाचा मृतदेह सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढण्यात आला. या बाबत नारायणगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती साहय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

हेही वाचा: पुणे : रिंगरोडच्या कामाला मिळणार गती

सुरेश घाडगे हे बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वीज पंप सुरू करण्यासाठी गेले होते. मात्र ते घरी परत आले नाहीत. विहीरीतील पाणी उपसा केल्या नंतर सुरेश घाडगे यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या बाबत सहायक पोलिस निरीक्षक ताटे म्हणाले, येथील विहिरीला कठडे नव्हते. सुरेश घाडगे हे पिण्याच्या पाण्यासाठी वीज पंप सुरू करण्यासाठी गेले होते. विजेचा धक्का बसून ते विहिरीत पडले की पाय घसरून पडले या बाबत माहीती घेतली जात आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुरेश घाडगे यांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजेल.

हेही वाचा: मंचर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा 'हात'