esakal | मंचर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा 'हात'

बोलून बातमी शोधा

manchar sub-district hospital
मंचर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा 'हात'
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील

मंचर : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असलेल्या मंचर उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य व विविध वस्तू देण्यासाठी व्यावसायिक व सेवाभावी संस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, मंचर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय घुले, लोकविश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. मंचर व्यापारी महासंघाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाला पोर्टेबल साउंड सिस्टीम, अवसरी खुर्द येथील शासकीय महाविद्यालय कोविड उपचार केंद्राला पाच पल्स ऑक्सिमीटर व मंचर पोलिस ठाण्याला मास्कचे वाटप करण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त जैन संघ व इनर्व्हील क्लब मंचर, सखाराम बागल यांच्या वतीने एकूण तीन वॉटर डिस्पेन्सर मशिन देण्यात आल्या.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी

अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष सूर्यकांत धायबर, घुले, तोडकर यांच्या हस्ते वस्तू प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आंबदास देवमाणे, डॉ. गणेश पवार, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी सागर काजळे, प्रशांत थोरात, भावेश पुंगलिया, रुपेश पुंगलिया, सुरेश पुंगलिया, कुशल राठोड, प्रियेश गांधी, अमित पुनमिया, श्रीपाल धोका, प्रशांत चोरडीया, रुपेश पारेख, सिद्धू पुनमिया, इनर्व्हील क्लबच्या अध्यक्षा मोनिका भंडारी, सचिव रचना राठोड, डॉ शिवमला धायबर, किरण पुंगलिया, डॉ स्नेहल गुजराथी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: जुन्नर : आचाऱ्याचा खून करणारा अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

मंचर येथील श्री गुरुदेवदत्त मित्र मंडळ व श्री गुरुदेवदत्त गणेश मंडळ पाटीलवाडा यांच्या वतीने मंगळवारी (ता. २७) उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांना सूचना देण्यासाठी व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व विरंगुळा मिळावा म्हणून ५० हजार रुपये किंमतीचे माईक, स्पीकर व अन्य साउंड सिस्टिमचे साहित्य मंडळाचे अध्यक्ष संतोष गावडे, विजय थोरात पाटील, सदानंद थोरात पाटील, नरेंद्र घुले, जयेश थोरात पाटील, बंटी मोरडे यांच्या हस्ते डॉ. देवमाने, डॉ. ढेकळे, डॉ. पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मंचर पोलिसांना ५० फूड पॅकेट बॉक्स, मास्क, पाच वाफेचे मशिन आणि सँनिटायजर बाटल्या आयआरबीचे सरव्यवस्थापक रवींद्र वायाळ यांनी पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्याकडे सुपूर्त केल्या आहेत.