पुणे जिल्ह्यात चार लाख मतदारांची आधार जोडणी पूर्ण

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत तसेच ऑनलाइन पद्धतीने १ ऑगस्ट २०२२ पासून आधार जोडणीचे कामकाज सुरु आहे.
Voter ID and Aadhar Card
Voter ID and Aadhar CardSakal
Summary

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत तसेच ऑनलाइन पद्धतीने १ ऑगस्ट २०२२ पासून आधार जोडणीचे कामकाज सुरु आहे.

पुणे - जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत तसेच ऑनलाइन पद्धतीने १ ऑगस्ट २०२२ पासून आधार जोडणीचे कामकाज सुरु आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे चार लाख मतदारांची मतदार यादीतील तपशिलाशी आधार जोडणी पूर्ण झाली आहे.

आधार जोडणी करण्यात प्रामुख्याने इंदापूर, आंबेगाव, भोर, खेड, मावळ या ग्रामीण भागातील मतदारांनी शहरी मतदारापेक्षा चांगला प्रतिसाद दिला आहे. मतदारांना त्यांचा आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशिलाशी जोडण्यासाठी अर्ज क्रमांक ‘६ ब’ भरावा लागेल. हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या संकेतस्थळ, वोटर पोर्टल किंवा वोटर हेल्पलाइन ॲपद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. मतदारांना मोबाईलमध्ये ॲप स्थापित करुन आधार जोडणी करता येईल.

या संदर्भात ११ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आधार जोडणीबाबत विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील सद्य:स्थिती

  • एकूण मतदार - ७८ लाख ६९ हजार २७६

  • आधार जोडणी केलेले मतदार - ३ लाख ८२ हजार ३५१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com