आधार कार्डचा गठ्ठा कचऱ्याच्या कुंडीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

हडपसर - हडपसर पोस्टात नागरिकांना वितरीत करण्यासाठी आलेली आधार कार्ड, पत्रे, एलआयसी नोटिसांचा गठ्ठा राजगेआळी येथील महापालिकेच्या कचरा कुंडीमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आढळून आली. ही कागदपत्रे कचरा कुंडीत जळत असताना तरुणांच्या लक्षात आले. त्यामुळे काही कागदपत्रे जळण्यापासून वाचली. तर काही जळून खाक झाली.

मिळालेली कागदपत्रे हडपसर पोस्ट कार्यालयात तरुणांनी व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जमा केली. ही कागदपत्रे आमच्या कर्मचाऱ्यांनी जाळली नसून, अज्ञात व्यक्तीने जाळल्याचा दावा सहायक आयुक्त कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते राजू म्हाडीक व त्यांच्या मित्रांना कागदपत्रे जळत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने आग विझविली. मात्र काही कागदपत्रे जळून खाक झाली. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे निरीक्षक सुनील घोळवे यांना दिली. घटनास्थळाची सुस्थितीत मिळालेली सुमारे 200 आधार कार्ड व अन्य कागदपत्रे घोळवे यांनी हडपसरचे पोस्टमास्तर ए. के. अवारे यांच्याकडे जमा केली. काही नागरिकांना गेली अनेक महिने आपले आधार कार्ड पोस्टाने येईल, यासाठी वाट पाहत होते. मात्र कचरा पेटीत आधार कार्ड मिळून आली आहेत, हे समजल्यानंतर अनेक नागरिकांनी कचराकुंडीकडे धाव घेतली. यापैकी काही नागरिकांना त्यांची आधार कार्ड मिळाली. ससाणेवस्ती, रामोशी आळी, हडपसर गावठाण, मगरआळी या भागांतील नागरिकांचे पत्ते असलेली आधार कार्ड व अन्य पत्रे या कचरा कुंडीत मिळून आली.

याबाबत आवारे म्हणाले, 'कचरा कुंडीत आढळलेली सर्व आधार कार्ड व कागदपत्रे जानेवारी व फेब्रुवारी 2014 मध्ये वितरीत करण्यासाठी आलेली आहेत. या भागातील तत्कालीन पोस्टमनची बदली झाली आहे. त्यामुळे नक्की या बाबत कोणत्या पोस्टमनने ही कागदपत्रे कचराकुंडीत टाकली याचा तपास सुरू आहे. मिळून आलेली कागदपत्रे ज्या नागरिकांची आहेत, त्यांना वाटप करण्यात येतील.

Web Title: aadhar card in dustbin