आम आदमी पक्षाचे पुणे महापालिकेत ठिय्या आंदोलन; वेधले 'या' गोष्टींकडे लक्ष

Aam Aadmi Party agitated in Pune corporation
Aam Aadmi Party agitated in Pune corporation

पुणे : शहरामध्ये कोविड, कोविड संशयित आणि बिगर कोविड रुग्णांना उपचार मिळण्यामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. बेड, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील जास्तीत जास्त बेड्‌स अधिग्रहीत करावेत, यासह विविध मागण्यांसाठी आम आदमी पक्षाच्या वतीने मंगळवारी महापालिका आयुक्त कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हेंटिलेटर नसल्याने डॉ लक्ष्मी नरसिंहन या शास्त्रज्ञासह पुण्यातील अनेक नागरिकांचा जीव हकनाक गेला आहे. बेड, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर यांचा पुणे शहरात तयार झालेला तुटवडा, ब्लॅक मार्केटिंग रोखण्याबाबत आणि येत्या काळात बेड, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर यांची संख्या वाढविण्याबाबत पक्षाच्या वतीने यापूर्वीही इमेलद्वारे प्रशासनाला निवेदन दिले होते. पण परिस्थितीत फारशी सुधारणा नसल्याने याचे गांभीर्य प्रशासनाला जाणवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले असल्याचे पक्षाचे संघटनमंत्री डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले. 

डॅशबोर्डवर कोविड केअर सेंटर वगळता पुणे शहरातील केवळ 42 रुग्णालय आहेत. पुण्यात खासगी रुग्णालयांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बेड अधिग्रहीत करून ते वापरात आणावेत. डॅशबोर्डवर हॉस्पिटलचा पत्ता, फोन नंबर, लोकेशन , रिअल टाइम अपडेट, ऑडिट अधिकारी फोन लिंक उपलब्ध करून द्यावी. तसेच रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, आदी मागण्यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आल्या. सोशल डिस्टन्स पाळत केलेल्या या आंदोलनामध्ये संयोजक मुकुंद किर्दत, आनंद अंकुश, सुहास पवार, मनोज थोरात, अशोक तळेकर, संदीप पासलकर आदी सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com