esakal | 'महाजॉब्स' म्हणजे नव्या आवरणात जुनाच माल; वाचा कोणी केली टीका?
sakal

बोलून बातमी शोधा

Mahajobs_Portal

महास्वयंवर उमेदवार आणि उद्योगातील रिक्त जागांची नोंदणी असताना एक नवीन पोर्टल तयार करण्यावर खर्च का केला गेला? जुन्या पोर्टलवरील नोंदी विश्वासार्ह नाहीत का?​

'महाजॉब्स' म्हणजे नव्या आवरणात जुनाच माल; वाचा कोणी केली टीका?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाजप-शिवसेना महायुती सरकार असताना सुसूत्रीकरणासाठी रोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकता यांचे एकत्रीकरण करून 'महास्वयं' हे पोर्टल सुरू केले आहे. त्यावर लाखो उमेदवारांनी नोंदणी केलेली असताना, त्यांना रोजगार मिळालेला नाही. मग आता 'महाजॉब्स' पोर्टल काढणे म्हणजे नव्या आवरणात जुनाच माल भरला आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

डिजिटल सातबारा उतारे काढण्याचा उच्चांक; भूमी अभिलेख विभागाच्या नावावर नवा विक्रम​

महाविकास आघाडी सरकारच्या उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास-उद्योजकता विभागाने 'महाजॉब्स' (https://mahajobs.maharashtra.gov.in/Portal/Login) हे नवीन पोर्टल सुरु केले आहे. त्याचा उद्देश, रोजगार शोधणार्‍यांना उद्योजकांशी जोडण्यासाठीचा संयुक्त उपक्रम आहे.

अखेर लडाखमधील सैन्य मागे; 'तो' वादग्रस्त भाग नवा बफर झोन म्हणून घोषित!​

महाजॉब्स उद्योजकांना कुशल कामगार देऊन त्यांचे काम सुरळीत पार पाडण्यास मदत करते. नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा म्हणून हे पोर्टल काम करेल. 'महास्वयं' पोर्टलचाही उद्देश तोच आहे. महास्वयं पोर्टलवर ६ लाख ३८ हजार ३१० रिक्त पदे आहेत, तर ८५ हजार १४६ उद्योगांची नोंदणी आहे आणि १८ लाख १८ हजार ४६३ उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या नोंदणीकृत उमेदवारांनी काय करायचे आहे ? महास्वयंवर उमेदवार आणि उद्योगातील रिक्त जागांची नोंदणी असताना एक नवीन पोर्टल तयार करण्यावर खर्च का केला गेला? जुन्या पोर्टलवरील नोंदी विश्वासार्ह नाहीत का? केवळ मराठी तरुणाला भुलवण्यासाठी याचा वापर केला जातो आहे का? अशी टीका मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image
go to top