मंचरला रविवारी पत्रकारांची कार्यशाळा

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 30 मार्च 2018

मंचर (पुणे): "आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, मावळ व मुळशी तालुक्‍यांतील पत्रकारांची कार्यशाळा रविवारी (ता. 1 एप्रिल) येथील जीवन मंगल कार्यालयात होणार आहे,'' अशी माहिती आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील यांनी दिली आहे.

या कार्यशाळेचे उद्‌घाटन सकाळी साडेनऊ वाजता "सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस यांच्या हस्ते व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. "सकाळ'च्या मुख्य उपसंपादक नयना निर्गुण, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. या वेळी सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे.

या कार्यशाळेचा सांगता समारंभ दुपारी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आंबेगाव तालुका भाजपचे अध्यक्ष संजय थोरात, भाजपचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, मराठी पत्रकार परिषदेचे कोशाध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल, कार्याध्यक्ष सुनील लोणकर, सरचिटणीस दत्ता म्हसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, असे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक शेंगाळे यांनी सांगितले.

Web Title: aambegaon taluka patrakar sangh Journalists workshop