'उशीरा का होईना शिक्षणमंत्र्यांना शहाणपण आलं'; 'आप'चा टोला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

ऑनलाईनमुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. परंतु त्याबाबत सरकारने ठोस कृती कार्यक्रम अथवा सुविधा निर्माण केल्या नाहीत.

पुणे : "राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ नोव्हेंबरला शाळा सुरु करू, अशी घोषणा काही दिवसापूर्वी केली. आणि आता शाळा सुरू करण्याबाबत दोन दिवसापूर्वी पालकांनी, तज्ञांनी सूचना मते द्यावीत असे आवाहन केले. हे उशिरा का होईना मंत्र्यांना आलेले शहाणपण आहे," असे मत आम आदमी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केले आहे.

Breaking:...तोपर्यंत सारसबाग खुली होणार नाही; महापालिकेने दिले स्पष्टीकरण

शालेय शिक्षण मंत्र्यांनी शाळा सुरू करण्याबाबत पालक, विद्यार्थी, संस्था चालक यांना मते मांडण्याचे आवाहन केले. यावर किर्दत यांनी आपली म्हणणे नोंदविली आहे. ते म्हणाले,"ऑनलाईनमुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. परंतु त्याबाबत सरकारने ठोस कृती कार्यक्रम अथवा सुविधा निर्माण केल्या नाहीत. विनाअनुदानित शाळांत शिक्षकांना पगार होत नाही, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खाजगी शाळा ऑनलाईन शिक्षणाच्या नावे अवाजवी फी वसुली करीत आहेत. त्याविरोधात पालक आवाज उठवीत आहेत. परंतु सरकारने अजून एकही शाळेवर ठोस कारवाई केलेली नाही.

चोरट्याचा दिवाळी धमाका; लक्ष्मीपूजेसाठी ठेवलेला पाच लाखाचा ऐवज पळविला​

कोरोना होऊनही लक्षणे नसणाऱ्यांची संख्या मोठी आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. अशा परिस्थितीत विद्यार्थी वा शिक्षक यांची सतत तपासणी कशी करणार? शिक्षक कोरोना बाधित झाल्यास मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शाळांमध्ये ५० टक्के मुले उपस्थित राहण्याने मुले सुरक्षित अंतर पाळतील याची खात्री कशी देता येईल. पालकांनी संमती पत्र दिल्याने शाळांची जबाबदारी संपते का? या सर्व बाबीबद्दल समाधानकारक उत्तरे सरकारने दिलेली नाहीत. सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AAP spokesperson Mukund Kirdat criticized education minister Varsha Gaikwad