खवय्यांचा आषाढोत्सव!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

26 टन मासळी आणि 500 टन चिकन फस्त
पुणे  - सुमारे 26 टन मासळी... 500 टन चिकन... दहा हजार किलो मटण फस्त करत पुणेकरांनी रविवारी आखाड पार्टी साजरी केली. आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने पार्टी आणि मेजवानीचे आयोजन केले गेले होते.

26 टन मासळी आणि 500 टन चिकन फस्त
पुणे  - सुमारे 26 टन मासळी... 500 टन चिकन... दहा हजार किलो मटण फस्त करत पुणेकरांनी रविवारी आखाड पार्टी साजरी केली. आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने पार्टी आणि मेजवानीचे आयोजन केले गेले होते.

पुढील रविवारी (ता. 12) श्रावण महिन्यास प्रारंभ होत आहे. सोमवार आणि त्यानंतर बुधवारी एकादशी, शनिवारी अमावास्या असल्याने मांसाहार करण्यासाठी रविवार हा एक दिवस अनेकांच्या हाती होता. तसेच रविवारची सुटी असल्याने पुणेकरांनी घरी, फार्म हाउस अशा विविध ठिकाणी आखाड पार्टीचे नियोजन केले होते. यामुळे मटण, चिकन, मासळीची मागणी दुप्पट झाली होती.

गणेश पेठेतील मासळी बाजार, विविध ठिकाणी असलेली मटण आणि चिकन विक्रीच्या दुकानासमोर सकाळपासूनच रांगा दिसत होत्या.

मासळीची आवक नियमित होती; परंतु मागणी जास्त असल्याने भावात थोडी वाढ झाली, अशी माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली. रविवारसाठी शनिवारीच चिकन विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती. साधारणपणे साडेसातशे टन इतक्‍या कोंबड्यांची विक्री झाली. यातून सुमारे पाचशे ते साडेपाचशे टन इतके चिकन विकले गेले, असे व्यापारी रूपेश परदेशी यांनी सांगितले. नियमित मागणीत दुपटीने वाढ झाली, मटणापेक्षा भाव कमी असल्याने चिकनला खवय्यांकडून पसंती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

मटणाच्या मागणीत वाढ
मटणाच्या मागणीत दुपटीने वाढ झाल्याचे विक्रेते मच्छिंद्र कांबळे यांनी नमूद केले. आषाढ महिन्याचा विचार करता मागणीत अपेक्षित वाढ झाली नाही, असे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. घरगुती ग्राहक, हॉटेल व्यावसायिक, खानावळ अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांकडून खरेदी झाली. मांसाहार पदार्थ तयार करून देणारे, विशेषत: कोकणी, मालवणी पद्धतीने पदार्थ तयार करून देणाऱ्यांकडे "ऑडर्स'ची संख्या वाढली होती.

खवय्यांकडून मटणापेक्षा चिकन बिर्याणीला अधिक मागणी होती. साधारणपणे एक किलो बिर्याणीचा भाव अकराशे रुपये किलो इतका आहे.
पार्टीपेक्षा घरगुती ग्राहकांकडून बिर्याणीला जास्त पसंती मिळत आहे.
- अनीस सोमजी, बिर्याणी विक्रेते

Web Title: aashadhi party celebration non veg