फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय परिषदेत अभय शहा करणार भारताचे प्रतिनिधीत्व

मिलिंद संगई
रविवार, 17 जून 2018

बारामती : येथील सामाजिक कार्यकर्ते अभय रामचंद शहा फ्रान्समधील रिम्स शहरात होणा-या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहे. 22 ते 24 जून दरम्यान रिम्स या ऐतिहासिक शहरात परस्परातील स्नेह, सलोखा व जिव्हाळा वृध्दींगत करणे हा या परिषदेचा उद्देश आहे.

सर्व्हास इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेचे भारतातील मुख्य या नात्याने अभय शहा या परिषदेत सहभाग नोंदविणार आहेत. या परिषदेतील मुख्य भाषण करण्याचा सन्मानही अभय शहा यांना मिळाला असून ते भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. शंभरवर्षांपूर्वी पहिल्या महायुध्दात रिम्स शहर सर्वाधिक बेचिराख झाले होते. लाखो सैनिक या वेळी मृत्यूमुखी पडले होते, युध्द नको शांतता हवी या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात येते. 

Web Title: Abhay Shah will represent India in International Conference at france

टॅग्स