Pune Teachers Constituency : अभिजीत बिचुकले यांना मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा पराभव; फक्त १९ मते मिळाली

MLC Election Result : अभिजीत बिचुकले यांना पुणे शिक्षक मतदारसंघात केवळ १९ मते मिळाली आणि ते बाद झाले. पुणे शिक्षक मतदारसंघात एकूण ३० उमेदवार होते, त्यापैकी आतापर्यंत १९ बाद झाले आहेत. कौस्तुभ गावडे यांना सर्वाधिक १७,६०० मते मिळाली आहेत.
Bigg Boss fame Abhijit Bichukale

Abhijit Bichukale faces a major setback in Pune Teachers Constituency MLC election 2026

esakal

Updated on: 

Bigg Boss fame Abhijit Bichukale: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी सुरू असलेली मतमोजणी सुरुच आहे. तब्बल २२ तासांपासून मतमोजणी सुरू असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. दरम्यान, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत त्यांना केवळ १९ मते मिळाली असून, मतमोजणीदरम्यान ते बाद झालेल्या उमेदवारांमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com