Eco-Friendly Ganesha Idol : पर्यावरणपूरक गणेशमुर्तीसाठी अभिजित धोंडफळे यांनी बनविले नवीन मिश्रण; पेटंट मिळविणारे पहिले शिल्पकार

त्यांना रवींद्र मिश्रण’ या नावाने पेटंट मिळाले
Eco-Friendly Ganesha Idol
Eco-Friendly Ganesha IdolSakal

पुणे : पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीचा वापर टाळण्यासाठी आणि शाडू मातीच्या मूर्तीपेक्षाही वजनाला हलकी असणारी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी अनोखे असे नवीन मिश्रण तयार केले आहे.

विशेष म्हणजे या मिश्रणासाठी त्यांना ‘पेटंट’ देखील मिळाले आहे. अशा पद्धतीचे पेटंट मिळविणारे ते पहिलेच शिल्पकार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या मिश्रणाला त्यांनी वडिलांचे नाव दिले आहे. त्यामुळे त्यांना रवींद्र मिश्रण’ या नावाने पेटंट मिळाले आहे.

या मिश्रणाची माहिती धोंडफळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पाण्यात टाकल्यानंतर मिश्रण विरघळण्याचा कालावधी, त्याचा पर्यावरणावर होणारा परिमाण यासह अनेक बाबींच्या चाचण्या घेण्यात आल्या.

जुलै २०१९ मध्ये पेटंटसाठी नोंदणी केली होती. सर्व प्रक्रीया पार पडल्यानंतर नुकतेच पेटंट मिळाले. कोणत्या वस्तूंपासून बनवलेले मुर्ती घ्यायची, असा प्रश्‍न अनेक गणेशभक्तांना दरवर्षी पडतो.

शाडूची मूर्ती वजनाला जड असते तर पीओपीच्या मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया केली असल्याने त्यांचे विसर्जन होणे सहज शक्य नसते. मात्र रवींद्र मिश्रणापासून तयार केलेली ‘गणेशमूर्ती’ खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरक आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मिश्रणात या घटकांचा वापर

- गाळाची माती

- शाडू माती

- भाताचे मऊ तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा

मिश्रणाची वैशिष्ट्ये

- पूर्णतः रसायन आणि रासायनिक विरहित

- विसर्जन केल्यानंतर माती झाडांसाठी वापरता येते

- दणकट मुर्ती तयार होते

- तयार झालेल्या मूर्तीचे वजन कमी असते

- शाडूमातीच्या मूर्तीपेक्षा ही मूर्ती लवकर सुकते

- मूर्तीवर कोणत्याही प्रकारचे रंगकाम करता येते

आजोबांनी केलेला पांगुळ अळीचा गणपती पर्यावरण पूरक पेपर लगद्यापासून १९५५ मध्ये केलेली मूर्ती अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. वडील रवींद्र यांचेही पर्यावरणपूरक कागदी लगद्याचे अनेक गणपती पुण्यात आणि पुण्याबाहेर गेले आहेत. यातूनच प्रेरणा घेत मी एका नवीन मिश्रणाच्या अभ्यासास सुरवात केली. या मिश्रणावर अनेक प्रयोग केले गेले. त्यानंतर आम्ही पेटंटसाठीची प्रक्रीया सुरू केली.

- अभिजित धोंडफळे, शिल्पकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com