ठंडा ठंडा कूलसाठी एसी, कूलरला पसंती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

पिंपरी - गेल्या आठ दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे हैराण होण्याची वेळ आली आहे. पंखा वेगाने फिरूनही घामाच्या धारा थांबत नाहीत. त्यातच हवामान खात्याने उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने पिंपरी-चिंचवडकरांनी त्यापासून बचाव करण्यासाठी ‘एसी’ आणि ‘कूलर’ खरेदी करण्यास सुरवात केली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा दहा टक्के अधिक ग्राहकांनी ‘एसी’ व ‘कूलर’ची खरेदी केली आहे. तसेच रोज मोठ्या संख्येने त्यांची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

ग्राहकांचा दरवर्षी ‘कूलर’, ‘एसी’ घेण्याचा वाढता कल लक्षात घेऊन यंदा कंपन्यांनी त्यामध्ये असंख्य प्रकार आणले आहेत. रिमोटवरील ‘कूलर’पासून, डिजिटल ‘एसी’ असे अनेक ‘फीचर्स’ही दिले आहेत. 

दरवर्षी होळीनंतर तापमान वाढायला सुरवात होते. मात्र, यंदा लहरी हवामानामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कडकडीत उन्हाने चांगलाच जम बसवला. पंख्याच्या साह्याने गर्मीवर मात करता येत नसल्याचे लक्षात आल्याने नागरिकांनी थेट ‘एसी’ व ‘कूलर’च्या खरेदीकडे मोर्चा वळविला. सध्या दिवसाला तीनशे ग्राहक ‘एसी’-‘कूलर’च्या खरेदीसाठी येत असल्याचे राधिका सेल्सचे अनिल पंजाबी यांनी सांगितले. त्यातही कूलरपेक्षा ‘एसी’ला अधिक मागणी आहे. 

कूलरच्या किमती पाच हजार रुपयांपासून २० हजार रुपयांपर्यंत आहेत, तर एसी २० हजारांपासून ४० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्याच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही, असेही 
पंजाबी म्हणाले. 

‘इन्व्हर्टर’वरही एसी
‘एसी’ बनविणाऱ्या बहुतांश कंपन्यांनी मागील वर्षी ‘इन्व्हर्टर’वर चालणारे एसी बाजारात आणले होते. मात्र, ग्राहकांकडून त्याला विशेष मागणी नव्हती. मात्र, उन्हाचा तडाखा आणि सातत्याने होणारे भारनियमन लक्षात घेऊन यंदा ग्राहकांनी ‘इन्व्हर्टर’वर चालणाऱ्या ‘एसी’ला पहिली पसंती दिली आहे. या प्रकारातील ‘एसी’ घेणाऱ्यांचे प्रमाण २२ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. 

मध्यमवर्गीयांचा ‘एसी’कडे कल
एसीमध्ये एक टनाच्या ‘एसी’ला सर्वाधिक मागणी आहे. हा ‘एसी’ दहा बाय पंधराची एक रूम थंड करू शकतो. त्यामुळे मध्यमवर्गीयांकडून या ‘एसी’ची खरेदी केली जाते, असे व्यावसायिक सांगतात.

Web Title: ac, coller demand