
प्रशांत सुरेश भुजबळ (वय 33) आणि कृष्णदेव सुभाष साबळे (वय 31) अशी ताब्यात घेतलेल्या पोलिसांची नावे आहेत. ग्रामीण पोलिस दलामध्ये दोघेही मंचर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत.
पुणे : सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग सुरू ठेवण्यासाठी 50 हजाराच्या लाचेची मागणी करून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मंचर पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता.2) रात्री उशिरा ताब्यात घेतले.
- मराठा आरक्षणाला पाठिंबाच, पण केंद्राची भूमिकाही महत्त्वाची : शरद पवार
प्रशांत सुरेश भुजबळ (वय 33) आणि कृष्णदेव सुभाष साबळे (वय 31) अशी ताब्यात घेतलेल्या पोलिसांची नावे आहेत. ग्रामीण पोलिस दलामध्ये दोघेही मंचर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. याप्रकरणी, दोघांविरुद्ध विरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. तक्रारदार हे क्रिकेटवर बेटींग लावतात, म्हणून भुजबळ आणि साबळे यांनी 30 सप्टेंबरला त्यांच्याकडून 50 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर यापुढे क्रिकेट बेटिंग सुरू ठेवण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे पुन्हा 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी याची याबाबत लाचलुपत विभागाकडे तक्रार केली.
- कोरोनामुक्त रुग्णांना उपमुख्यमंत्र्यांचा दिलासा; शहरात सुरू होणार 'पोस्ट कोविड ओपीडी' सेंटर!
विभागाने त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी दोन्ही पोलिसांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता सापळा रचून दोघांना 20 हजाराची लाच घेताना पकडले. विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)