कोरोनामुक्त रुग्णांना उपमुख्यमंत्र्यांचा दिलासा; शहरात सुरू होणार 'पोस्ट कोविड ओपीडी' सेंटर!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

ग्रामीण भागातील रुग्णालयांमधील उपचारासाठीचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय उपकरणे दुरुस्तीअभावी बंद राहू नयेत, याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच, रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी. 

पुणे : जिल्ह्यात कोरोना आजारातून बरे होणाऱ्या नागरिकांसाठी उपचार आणि समुपदेशनासाठी दोन्ही जम्बो रुग्णालये, ससून रुग्णालय, बाणेर कोविड रुग्णालय आणि नायडू रुग्णालय अशा पाच रुग्णालयांत 'पोस्ट कोविड ओपीडी' सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मराठा आरक्षणाला पाठिंबाच, पण केंद्राची भूमिकाही महत्त्वाची : शरद पवार​

'कोविड व्यवस्थापना’बाबत शुक्रवारी (ता.२) उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. पवार म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना आजारातून बरे झालेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवत असल्यास त्यांना औषधोपचार आणि समुपदेशन देण्याच्या दृष्टीने 'पोस्ट कोविड ओपीडी' लवकर सुरु होणे आवश्यक आहे.

शहरातील पाच रुग्णालयात ही ओपीडी सुरु झाल्यानंतर अन्य रुग्णालये आणि ग्रामीण भागातही टप्प्याटप्प्याने ही सुविधा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. रुग्णांवर उपचार करताना आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमधील उपचारासाठीचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय उपकरणे दुरुस्तीअभावी बंद राहू नयेत, याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच, रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी. 

न्यायालयाने नोटीस बजावली अन् रखडलेल्या घटस्फोटाचा मार्ग झाला मोकळा​

कामगारांमुळे कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी कंपन्यांमध्ये प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हायला हवे. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेच्या अनुषंगाने घरोघरी सर्वेक्षणावर भर देत बाधित रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होईल. शहरात काही नागरिक विना मास्क रस्त्यावर फिरताना आढळतात. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Post covid OPD will be started in five hospitals for corona free patients says Deputy CM Ajit Pawar