बाल लैंगिक अत्याचाराची केस दाबण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला बेड्या

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 27 November 2020

पोलिस उपनिरीक्षक किर्वे याने एक लाखाच्या लाचेची मागणी केली होती. परंतु, तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यानी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर किर्वे यास 35 हजाराची लाच मागताना अटक करण्यात आले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त विजयमाला पवार करत आहे.

पुणे: बाल लैंगिक अत्याचाराच्या (पोस्को) गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाख रूपयांच्या लाचेची मागणी करीत  तडजोडीअंती 35 हजाराची मागणी करणाऱ्या एका पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहर होणार मुंबई शहरापेक्षा मोठे; कसे ते वाचा सविस्तर

प्रशांत कोंडीराम किर्वे असे अटक केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. किर्वे हा येरवडा येथील लक्ष्मीनगर पोलिस चौकीत कार्यरत आहे.  याप्रकरणी एका पोस्कोच्या गुन्ह्यात तक्रारदाराला व त्यांच्या आईला आरोपी न करण्यासाठी  पोलिस उपनिरीक्षक किर्वे याने एक लाखाच्या लाचेची मागणी केली होती. परंतु, तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यानी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर किर्वे यास 35 हजाराची लाच मागताना अटक करण्यात आले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त विजयमाला पवार करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ACB Team arrested Police Sub Inspector POSCO case bribe demand in pune