सासवडजवळ अभिनेते प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात

Pravin Tarde
Pravin Tarde

सासवड : सासवड ते बोपदेवघाटमार्गे पुणे रस्त्यावर मौजे हिवरे गावानजीक चित्रपट अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या कारला मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातातून ते सुखरूप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सीटबेल्ट लावल्याने व एअर बॅग्ज ओपन झाल्याने तरडे व समवेतचे कलावंत रमेश परदेशी सुखरुप आहेत. मागे सीट बेल्ट न लावता बसलेले कार्यकारी निर्माता विशाल चांदणे हे मात्र झाडाला कार धडकल्यावर त्याच्या धक्क्याने उडून पुढे पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर जखम झाली. दोन टाके पडले आहेत.

तरडे यांची गाडी (एमएच 11 सीएच 11) बीएमडब्ल्यूची स्पोर्ट्स कार प्रकारातील होती. गाडीचे सुमारे 15 लाखांहून अधिक नुकसान झाले. याबाबत माहिती पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप व स्वतः तरडे यांनी आज सकाळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com