पुणे शहरात अपघात काही घटेनात! ११ महिन्यांत ६३४ अपघात

पुणे शहरात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हकनाक बळी जात असल्याची स्थिती आहे. मागील वर्षभरात शहरात ६३४ अपघात झाले.
Accident
AccidentSakal

पुणे - शहरात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हकनाक बळी जात असल्याची स्थिती आहे. मागील वर्षभरात शहरात ६३४ अपघात झाले. त्यातील २०४ अपघातांमध्ये तब्बल २१७ नागरिकांना जीव गमवावा लागला, तर गंभीर जखमी झालेल्या ३३९ जणांचे कायमस्वरूपी अपंगत्व आले. बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून, त्यांच्या चुकीमुळे त्यांच्यासह इतरांचेही जीव धोक्‍यात येत असल्याचे चित्र आहे.

अपघातांची कारणे

हयगयीने व निष्काळजीपणे वाहने चालविणे

वाहन भरधाव वेगाने चालविणे

मद्यपान करून वाहन चालविणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक

तीव्र उतार, तीव्र वळण, खराब रस्ते व अन्य कारणे

अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजना

  • शहराच्या वेगवेगळ्या भागांत ‘ब्लॅक स्पॉट्स’ची निश्‍चिती

  • पोलिसांसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांच्या घटनास्थळी भेटी व पाहणी

  • खड्डे, साईन बोर्ड, गतिरोधक, रम्बलर्स, रिफ्लेक्‍टर, झेब्रा क्रॉसिंग रंगविणे आदी

  • नागरिकांमध्ये जागृती करण्यावर सर्वाधिक भर

  • रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे

Accident
Photo Gallery: पुणे बनलं महाबळेश्वर!

१४३ : २०२०मधील प्राणघातक अपघात

३ : चालकाने मद्यपान केल्याने झालेले अपघात

३ : मृत्यू

१०७ : दुचाकी अपघात

४ : विनाहेल्मेट

आकडे बोलतात

  • २९,६१,५९२ - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या

  • १,१६,४९,४५,०५० - दंडाची एकूण रक्कम

  • ७,६२,१८३ - दंड भरणाऱ्यांची संख्या

  • २०,६९,२५,१०० - भरलेल्या दंडाची रक्कम

  • २१,९९,४०,०९ - दंड न भरणाऱ्यांची संख्या

  • ९८,५०,१९, ९५० - दंड न भरणाऱ्यांची दंडात्मक रक्कम

  • १९ - शहरातील एकूण अपघातप्रवण क्षेत्रे

अपघातप्रवण ठिकाणे निश्‍चित करून महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व अन्य सरकारी संस्थांची मदत घेऊन तेथे आवश्‍यक पायाभूत सोई-सुविधा पुरविल्या जातात. अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडूनही सातत्याने दंडात्मक कारवाई केली जाते. असे असले तरीही नागरीकांनी हेल्मेट, सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादा व वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघात टळतील. आम्हीही जनजागृतीवर भर देत आहोत.

- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा

दुचाकीवरून जाताना एका वळणावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात डोक्‍याला, पायाला गंभीर दुखापत झाल्याने दोन वर्ष उपचार सुरू होते. आता व्यवस्थित झालो आहे. मात्र, एक पाय

निकामी झाल्याने नोकरी गमवावी लागली व आयुष्यावर गंभीर परिणाम झाला.

- वैभव पाटील, अपघातग्रस्त तरुण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com