मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; मृतदेहावरून गेली अनेक वाहनं

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

- भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका व्यक्तीला दिली धडक. 

कामशेत (पुणे) : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका व्यक्तीला धडक दिली. त्यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बौर गावाच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशोक प्रभाकर मगर (वय-५६) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत संतोष अशोक मगर यांनी कामशेत पोलिसात तक्रार दिली. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक मगर सायंकाळी साडेसातच्या सुमारास द्रुतगती महामार्गावर ओलांडून जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने त्यांना ठोकर दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन आणि अज्ञात चालकाविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे करीत आहे.

बस-ट्रकचा भीषण अपघात; 19 जणांचा मृत्यू

अनेक वाहनं गेली मृतदेहावरून

अशोक मगर यांचा जागेवरच मृत्यू झाल्याने त्यांच्या मृतदेहावरून एक्स्प्रेसवरून जाणारी अनेक वाहने गेली असल्याची माहिती देण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Mumbai Pune expressway one person died