Accident News : नियम मोडून आलेल्या अवजड डंपरची स्कूल बसला धडक

बसमध्ये चढत असलेली चिमुकली पडली रस्त्यावर; किरकटवाडी येथील घटना
Accident News
Accident Newsesakal

किरकटवाडी - जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करुन आलेल्या अवजड डंपरने सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास किरकटवाडी चौकात उभ्या असलेल्या स्कूल बसला मागून धडक दिली. बसमध्ये चढत असलेली चिमुकली यावेळी रस्त्यावर पडली व बसमधील एका विद्यार्थ्यालाही मार लागला. दोन्हीही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. यावेळी संतप्त झालेल्या पालकांनी काहीकाळ वाहतूक अडवून धरली होती.

किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर सकाळी 8:30 ते 11 वाजेपर्यंत अवजड वाहतूकीस जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली असताना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अवजड डंपर नांदोशीकडे जात होता. किरकटवाडी येथील वर्दळीच्या मुख्य चौकात स्कूल बस थांबलेली होती व विद्यार्थी बसमध्ये चढत होते. उभ्या असलेल्या स्कूल बसला अवजड डंपरने मागून धडक दिल्याने बस पुढे ढकलली गेली. बसमध्ये चढत असलेली चिमुकली या धक्क्यामुळे खाली रस्त्यावर पडली. तसेच बसमधील एका विद्यार्थ्यालाही मुका मार लागला आहे.

डंपरची बसला धडक बसल्यानंतर विद्यार्थी घाबरून मोठमोठ्याने रडत होते. संतापलेल्या पालकांनी काहीकाळ रस्ता अडवून धरला होता. एका नागरिकाने 112 नंबरवर फोन केला असता हवेली पोलीस ठाण्यातून त्यांना फोन आला की, 'तुम्ही तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात या तरच आम्ही तिकडे येऊ.' पोलीस जाणीवपूर्वक घटनास्थळी येण्यास टाळाटाळ करत असल्याचे पोलीसांनी संबंधित नागरिकाला दिलेल्या उत्तरावरुन दिसून येत होते. याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

Accident News
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

गांभीर्य का नाही?...... अवजड वाहतूकीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. किमान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे ही माफक अपेक्षा नागरिक करत असताना पोलीस मात्र याबाबत गंभीर नसल्याचा आरोप नागरिक विकास हगवणे यांनी केला आहे. नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झालेला असताना अंमलबजावणीसाठी तैनात असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी किरकटवाडी येथे हजर नव्हते.

Accident News
Chh. Sambhaji Nagar : गुंडांकरवी बिल्डरची रो-हाऊसधारकांना बेदम मारहाण! काहींची फुटली डोकी; महिला, मुलांनाही सोडले नाही

नागरिक आंदोलनाच्या तयारीत..... अनेक वेळा निवेदन देऊन प्रशासन अवजड वाहतुकीबाबत कडक कारवाई करत नसल्याने नागरिक संतप्त झाले असून किरकटवाडी गावातील स्थानिक रहिवासी व विविध सोसायट्यांतील रहिवासी मिळून तीव्र स्वरुपात आंदोलन करणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com