Accident News : खळद येथे रस्त्यावरती बंद पडलेल्या ट्रकला धडकून एक जण जखमी

बंद अवस्थेत तीन दिवसांपासून ट्रक त्याच ठिकाणी थांबलेला पाहावयास मिळत आहे.
accident
accidentsakal

खळद - खळद (ता.पुरंदर) येथे सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलच्या गेट समोर एक मोठा मालवाहतूक ट्रक तीन ते चार दिवसापासून बंद पडलेल्या अवस्थेत असून संबंधित ट्रकला रविवार (ता.१५) रोजी सायंकाळी एक दुचाकी स्वार धककून गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली. संबंधित दुचाकीस्वाराने हेल्मेट घातल्याने मोठा अनर्थ टळला.

आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम हे सासवड ते जेजुरी दरम्यान सुरू असून येथे या कामामुळे एकाच मार्गावरून दोन्ही वाहतूक सुरू आहेत.एकतर अरुंद रस्ता व एकाच मार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक होत असल्याने संबंधित महामार्ग हा धोकादायक बनला आहे. अशातच या ठिकाणी हा ट्रक रस्त्यावरच बंद पडल्याने वाहतुकी वरती मोठा परिणाम होत आहे. यासमोर इंग्रजी माध्यमाची शाळा असल्याने येथे तालुक्यातून हजारो विद्यार्थी, असंख्य वाहनातून शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीची कोंडी होऊन मोठा धोका संबंवतो.

accident
CR Kesavan Join BJP: भारताच्या माजी गृहमंत्र्यांचा पणतू काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल

सदर ट्रक बंद पडल्यानंतर याची तात्काळ दुरुस्ती अथवा हा बाजुला घेणे गरजेचे होते मात्र बंद अवस्थेत तीन दिवसांपासून ट्रक त्याच ठिकाणी थांबलेला पाहावयास मिळत आहे.

याबाबत सासवड पोलीस स्टेशनला घडलेल्या घटनेची माहिती देऊन भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी संबंधित ट्रक मालकास समज देऊन गाडी बाजूला घेण्याच्या सूचना करव्यात अन्यथा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रवाशी, ग्रामस्थ, पालकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com