दोन कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तीन जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावरील फुरसुंगी फाट्याजवळ पहाटे झाला अपघात
accident news Pune-Solapur Highway Two killed in car accident three injured
accident news Pune-Solapur Highway Two killed in car accident three injuredesakal

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर फुरसुंगी फाटा चौकात दोन कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर तिघांना लोणी काळभोरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरुवारी (ता. २८) आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. श्रीनीक प्रभाकर होले (वय २७, रा. यवत, ता. दौंड) आणि एक पादचारी (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) या दोघांचा अपघातात मृत्यू झाला, तर संकेत बाळासाहेब भंडलकर (वय-२१,) सुनिल निळाराम शितकल (वय-२२, रा. दोघेही केसनंद, ता. हवेली), अनिल बाळासाहेब जाधव (वय-२२, रा. पोंडे, ता. पुरंदर) असे जखमी असलेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी हर्बल संजय चांदणे (वय २६, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, (ता. हवेली) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी (त. २८) हर्शल चांदणे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास जात असताना फुरसुंगी फाटा येथे फोक्सोगन व्हेन्टो आणि मारुती सुझुकी अल्टो जोरात धडक बसून अपघात झाला. व्हेन्टो कार रस्त्याच्या बाजूच्या झाडाला धडकल्याने त्यातील एकजण रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यातुन खुप रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुध्द झाला होता. दरम्यान, जखमीच्या खिशातील पॅनकार्डवर श्रीनीक प्रभाकर होले असे आढळून आले. तसेच अल्टो कारमधून सुनिल निलेश शितकलव संकेत मंडलकर यांना हडपसर पोलिसांनी तात्काळ लोणी काळभोर येथील रुगणालयात सर्वाना हलविले. मात्र श्रीनीक प्रभाकर होले याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com