Accident News: दुर्दैवी! पुण्यातील मुठानदीच्या पुलावर भीषण अपघात; मुलीचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाने धडक दिली; महामार्गावर वाहतूक कोंडी
accident
accidentsakal

खडकवासला : बाह्यवळण महामार्गावर वारजे येथील मुठा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात दुचाकी चालक तरुण मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजून ५० मिनिटांनी घडली आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

ऋतुजा दिलीप वायकर (वय- 23, रा.नऱ्हे आंबेगाव) असे त्या महिलेचे नाव आहे. ती बावधन येथून महामार्गावरून घरी निघाली होती. अशी माहिती वारजे पोलिस ठाण्याचे निरीक्षक दगडू हाके यांनी दिली.

accident
Pune Accident : हडपसर-सासवड रस्ता अपघातात स्वच्छता कर्मचारी महिलेचा जागीच मृत्यू

अद्याप अपघाताची माहिती देणारी व्यक्ती कोणी नाही. त्यामुळे, अपघात कसा घडला याचा तपास केला जात आहे. त्या मुलीच्या वाहनांचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. त्यावरून, अज्ञात वाहनाने धडक दिली असावी. असा अंदाज पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी व्यक्त केला.

accident
Pune Hoarding Accident : वाघोलीत होर्डिंगस् मुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरूच; दुचाकीधारक दाम्पत्य जखमी

'अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती घटनेतील वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली जात आहे. दरम्यान, दुचाकीच्या क्रमांकावरून तिच्या वडिलांशी संपर्क झाला. ते तातडीने घटनास्थळी पोचले. तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. त्यावेळी तिचे वडील सोबत गेले आहेत.' अशी माहिती वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विशाल पवार यांनी दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com