पुणे : उरूळी कांचनजवळ अपघातात 2 जण ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

ट्रकचे चाक पंक्चर झाल्याने शैहफान व त्यांचा भाऊ महेश हा रस्त्यावर उतरून पाहणी करत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने धडक दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.

पुणे - पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन हद्दीत आज (शनिवारी) पहाटे चार वाजता रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून टॅकर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.  

या अपघातात अंकुश राजाभाऊ पंडीत (वय, 14, रा. दहामोनी ता . सोनपेठ जि. परभणी ) व टॅकर चालक एकनाथ विश्वनाथ बाचारे (वय 37, रा.  दहामोनी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर टॅकरमधील प्रवासी मेघराज नाथाराव हनवटे (वय, 36, रा. चांदापूर ता. परळी बीड), राजू विश्वनाथ पंडीत (वय, 35 रा.  दहामोनी), कांताबाई मरीबा उजगर (वय, 45, रा. मांडवा परभणी ), इंदू राजू पंडित (वय 33, दहामोनी) व ट्रक चालक शैहफान दशरथ शेख (वय 23, इंदापूर ) जखमी झाले आहेत. शैहफान गंभीर जखमी असून, शैहफानसह सर्व जखमींना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रकचे चाक पंक्चर झाल्याने शैहफान व त्यांचा भाऊ महेश हा रस्त्यावर उतरून पाहणी करत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने धडक दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.

Web Title: accident on Pune-Solapaur highway