गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात; किरकोळ जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

आनंद शिंदे यांच्या कारला पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक हद्दीत पाठीमागून डंपरने धडक दिली. या अपघातात शिंदे किरकोळ जखमी झाले. इंदापूर येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. 

इंदापूर : सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर आज (मंगळवार) पहाटे इंदापूरजवळ अपघात झाला. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद शिंदे यांच्या कारला पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक हद्दीत पाठीमागून डंपरने धडक दिली. या अपघातात शिंदे किरकोळ जखमी झाले. इंदापूर येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. 

आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मात्र पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. आनंद शिंदे यांच्या पायाला मार लागल्याची माहिती मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident on singer Anand Shinde car at Pune-Solapur highway