टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

संदीप घिसे 
मंगळवार, 15 मे 2018

पिंपरी (पुणे) : 'नो-एंट्री'मधून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दिघीच्या मॅगेझीन चौक परिसरात मंगळवारी (ता.15) सकाळी घडली.

पिंपरी (पुणे) : 'नो-एंट्री'मधून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दिघीच्या मॅगेझीन चौक परिसरात मंगळवारी (ता.15) सकाळी घडली.

ऋषिकेश संजय शिराळकर (वय 21 रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा आपल्या दुचाकीवरून घरी चालला होता. तो दिघीतील मँक्झीन चौकात आला असता, समोरून  नो एंट्रीमधून आलेल्या टेम्पो (एमएच 14- ईएम-4655) याने शिराळकर यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या शिराळकर यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दिघी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: in accident of tempo and two wheeler dies one