भीमाशंकरजवळ ट्रॅव्हल्सला अपघात 3 ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

मंचर : भीमाशंकरहून मंचरच्या दिशेने येणाऱ्या खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत.

मंचर : भीमाशंकरहून मंचरच्या दिशेने येणाऱ्या खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत.

शुक्रवारी रात्री अकरा वाजता खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स पुण्याच्या दिशेने येते होती. यावेळी 43 प्रवासी प्रवास करत होते. ट्रॅव्हल्स पोकरी घाटात पोचल्यानंतर चालकाला वळण लक्षात न आल्याने ट्रॅव्हल्स दरीच्या दिशेने गेली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कठड्याला अडकून ट्रॅव्हल्स दरीत कोसळली नाही. तरीही हा अपघात एवढा भीषण होता की तीन जण जागीच ठार झाले. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर मंचरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सविस्तर माहितीची प्रतिक्षा आहे.

Web Title: Accident for Travels; 3 dead