आळंदीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात

शरद पाबळे
मंगळवार, 25 जून 2019

कोरेगाव भीमा : चाकण शिक्रापूर रस्त्यावर जातेगाव फाटा (ता. शिरूर, जि. पुणे) येथे साडेअकराच्या सुमारास मांगेगाव (ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथील वारकरी दिंडीच्या टेम्पोचा अपघात झाला आहे. 

कोरेगाव भीमा : चाकण शिक्रापूर रस्त्यावर जातेगाव फाटा (ता. शिरूर, जि. पुणे) येथे साडेअकराच्या सुमारास मांगेगाव (ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथील वारकरी दिंडीच्या टेम्पोचा अपघात झाला आहे. 

वारकऱ्यांना घेऊन माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीकडे हा टेम्पो जात होता.यावेळी जातेगाव फाट्याजवळ शिक्रापूरकडून चाकणच्या दिशेने जाताना एका हॉटेल मधून बाहेर येणाऱ्या कंटेनारची जोरदार धडक टेम्पोला बसली. या अपघातात सुमारे ८ ते ९ वारकरी जखमी झाले.

अपघाताची खबर मिळताच शिक्रापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमीं वारकऱ्यांना प्राथमिक उपचारासाठी शिक्रापूर येथे नेण्यात आले. जखमीवर शिक्रापूरात रक्षक व माऊलीनाथ रुग्णालयात उपचार सुरु असून अधिक तपास शिकापूर पोलिस करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident of Varkari tempo while going to Alandi