पिंपरीत मैत्रिणीला सोडून परतताना तरुणाचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पिंपरी चिंचवड : मैत्रिणीला सोडून परत येत असताना तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी येथे मंगळवारी सकाळी घडली.अमन पांडे असे या तरुणाचे नाव असून तो मैत्रीण आदिती जयस्वालला इंटरव्ह्यूसाठी कंपनीत सोडायला गेला होता. परत येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याचा अपघात झाला
 
दुचाकी चालवताना अमनने हेल्मेट घातले नव्हते, अशी माहितीही समोर आली असून अमनने हेल्मेट घातले असते तर हा प्रसंग ओढावला नसता, असे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन पांडे आणि आदिती जयस्वाल हे मित्र होते. मंगळवारी आदितीचा हिंजवडीमधील एका कंपनीत इंटरव्ह्यू होता. यासाठी अमन तिला दुचाकीवरून सोडण्यासाठी गेला. आदितीला कंपनीच्या गेटवर सोडून तो परत निघाला. अमन हा १४० किमी प्रतितास या वेगाने दुचाकी चालवत होता आणि त्याने हेल्मेटही घातले नव्हते. विप्रो सर्कलच्या दिशेने येत असताना वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट दुभाजक ओलांडून दुचाकीसह विरुद्ध दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवर पडला. याच दरम्यान तिथून एक कार जात होती. त्या कारखाली सापडून अमनचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: Accident of youth while droping his friend