Accident News : अपघात वाढले, पण मृत्यूचे प्रमाण घटले ; हेल्मेट कारवाई, रस्त्याची कामे केल्याने आकडेवारीत घट

भरधाव वेगाने वाहने चालविण्यावर झालेली कारवाई असो वा दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे असो आदी कारणांमुळे पुण्यात अपघाताचे प्रमाण घटले नसले तरीही नागरिकांच्या मृत्यूच्या प्रमाणात मात्र घट झाली आहे.
Accident News
Accident News sakal

पुणे : भरधाव वेगाने वाहने चालविण्यावर झालेली कारवाई असो वा दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे असो आदी कारणांमुळे पुण्यात अपघाताचे प्रमाण घटले नसले तरीही नागरिकांच्या मृत्यूच्या प्रमाणात मात्र घट झाली आहे. पुणे शहर व जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांचे प्रमाण वाढले.

मात्र, अपघातात मृत्यूुमुखी पडण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. पुणे आरटीओ व ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’च्या वतीने जिल्हा प्रशासनाला पुण्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा अहवाल सादर केला होता. त्याच्या अंमलबजावणीनंतर हा बदल दिसत आहे.

Accident News
Accident News: लग्नाची वरात घेऊन जात असताना क्षणात होत्याचं नव्हतं झालं...; नवरदेवासह ४ जणांचा होरपळून मृत्यू

पुणे आरटीओ प्रशासनाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी पुणे - सोलापूर , पुणे - सातारा व पुणे - अहमदनगर रस्त्याचा सर्व्हे केला. त्यात अपघाताची कारणे, त्यासाठीच्या उपाययोजना आदींबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. जिल्हा प्रशासनाने तत्काळ केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर भर दिला. परिणामी पुण्यातील काही ठिकाणी अपघातांचे प्रमाण घटले. यात अपघाताचा हॉटस्पॉट ठरलेल्या नवले पुलाचा देखील समावेश आहे.

वाहनांच्या वेगावर व हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर सातत्याने कारवाई करण्यात आली. तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याने अपघातात मृत्युमुखी पडण्याच्या प्रमाणात घट झाली आहे.

- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी), पुणे

अपघाताची आकडेवारी

(पुणे ग्रामीण)

वर्ष अपघाताची संख्या मृत्यू

२०२३ : ४२३ : २३५

२०२४ : ५०७ : २२१

(पुणे शहर)

२०२३ : ३०५ : १०५

२०२४ : ३८२ : ९२

(ही आकडेवारी जानेवारी ते मार्च दरम्यानची आहे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com