पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीला अटक

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 29 एप्रिल 2018

राहुलने त्याची पत्नी कोमलचा गुरुवारी (ता.२६) खून केला होता. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात राहुल विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिल्यानंतर सिंहगड पोलीस त्याला फरासखाना पोलीस स्टेशन मधील तुरुंगामध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असताना तो आप्पा बळवंत चौकातून पोलिसाला धक्का देऊन पळून गेला होता.

कोंढवे धावडे - नऱ्हे येथे पत्नीचा खून केलेला आरोपी राहुल हंडाळ हा शनिवारी फरासखाना येथून पोलिसाला ढकलून पळून गेला होता. कोंढवे धावडे येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोड पोलिस ठाणे व गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या संयुक्त पथकाने त्याला पकडले. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

राहुलने त्याची पत्नी कोमलचा गुरुवारी (ता. २६) खून केला होता. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात राहुल विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिल्यानंतर सिंहगड पोलीस त्याला फरासखाना पोलिस स्टेशन मधील तुरुंगामध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असताना तो आप्पा बळवंत चौकातून पोलिसाला धक्का देऊन पळून गेला होता.

तो सध्या नऱ्हे येथे राहत असला, तरी यापूर्वी तो वारजे माळवाडी परिसरात राहत होता. यामुळे, तो या परिसरात येण्याची शक्यता होती. त्याच्यावर लक्ष ठेवले. त्यानुसार त्याचा तपास घेतला जात होता. गुन्हे शाखा युनिट १ चे सचिन जाधव याच्या विश्वसनीय खबऱ्याने राहुल हा कोंढवे धावडे येथील त्याच्या मित्राकडे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट एकचे पोलिस उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, रिजवान जेनेडि, उमेश काटे, अशोक माने, प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने उत्तमनगर भागात रात्री सापळा लावला. रात्री दीडच्या सुमारास तो कोंढवे धावडे येथे श्रीमंत काळ भैरवनाथ मित्र मंडळासमोरून जात असताना दिसला त्यावेळी त्याला ताब्यात घेतले. 

Web Title: accused arrested by the police