भांडण सोडवणं पडलं महागात; चिखलीतील तरुणावर कोयत्याने वार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

'तुम्ही माझ्या घरी का गेले' असे म्हणत आरोपी रुषी याने फिर्यादीला शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्‍यात दगड मारला. तर आरोपी उमेश याने फिर्यादीला हाताने आणि लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली.

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटात भांडणे झाली. दरम्यान, 'माझ्या टपरीसमोर भांडणे करू नका,' असे म्हणत हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर एका गटातील आरोपींनी कोयत्याने वार करीत बेदम मारहाण केली. ही घटना चिखलीतील कृष्णानगर येथे घडली. 

पहिल्या प्रकरणात रुषी महानवर, उमेश उर्फ बाळा देवकाते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पुनीत प्रकाश जोगीन (वय 22, रा. माऊली हौसिंग सोसायटी, अष्टविनायक चौक, मोरेवस्ती, चिखली, मूळ-कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांचे भाडेकरू सुनील गावडे यांना शिवीगाळ केली होती. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादीसह सुनिल गावडे, ओम गावडे, अनिल गावडे हे आरोपी रुषी महानवर याच्या घरी गेले. मात्र, तो घरी नव्हता.

डिलिव्हरी बॉयने साकारला 'स्वराज्याची राजधानी'; पिंपरीतल्या युवकाचं होतंय कौतुक!​

रुषी याने सुनिल गावडे यांना फोन करून माझ्या घरी का गेला असे म्हणत गावडे यांना फोनवरून शिवीगाळ केली. त्यांना कृष्णानगर भाजी मंडई चौकात या असे म्हणाला. त्यानुसार फिर्यादी आणि इतर कृष्णानगर चौकात गेले. तेथे आरोपींसह त्यांचे दोन साथीदार होते. दरम्यान, 'तुम्ही माझ्या घरी का गेले' असे म्हणत आरोपी रुषी याने फिर्यादीला शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्‍यात दगड मारला. तर आरोपी उमेश याने फिर्यादीला हाताने आणि लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. 

येथे सर्व कामे विनामूल्य होतात...पोलिस ठाण्यातील पाटी चर्चेचा विषय​

दरम्यान, हा प्रकार धम्मपाल माणिक पालके (वय 20, रा. यशवंत कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) यांच्या कृष्णानगर येथील भाजी मंडई चौकातील टपरीसमोर मंगळवारी (ता.24) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. त्यावेळी "माझ्या टपरीजवळ भांडणे करु नका पुढे जा' असे त्यांना म्हणाले. त्यावेळी भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडल्याच्याकारणावरून सुनील गावडे, श्रेयश शेतसंदी, दादा शेंडगे, पुनीत जोगीन, अनिल गावडे, सचिन ढगे (सर्व रा. मोरेवस्ती, चिखली) या आरोपींनी पालके यांना बेदम मारहाण केली. फिर्यादी यांची भाजी मंडई चौकात टपरी असून मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते टपरीवर होते. त्यावेळी आरोपी मोटारीतून येऊन टपरीसमोर थांबले. त्याचवेळी दोन दुचाकीवरून आणखी चार ते पाचजण टपरीसमोर आले.

हेही वाचा - Sakal Exclusive : मेट्रो खोदकामावेळी पुण्यात सापडले भल्यामोठ्या प्राण्यांचे अवशेष; हत्तीची हाडं असल्याचा निष्कर्ष

त्यांच्यात आपआपसात वाद सुरू झाला असता फिर्यादी म्हणाले की, 'माझ्या टपरीजवळ भांडणे करु नका पुढे जा'. त्यानंतर दुचाकीवरून आलेले चार ते पाचजण तेथून निघून गेले. दरम्यान, सुनील गावडे याने "तू आमच्या भांडणामध्ये का पडला' असे म्हणत फायबरचा पाईप फिर्यादीच्या डोक्‍यात मारला. तर श्रेयश शेतसुंदी याने कोयत्याने फिर्यादीवर वार केला. तर इतर आरोपींनी फिर्यादीला पकडून शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused attacked youth who had gone to settle quarrel