esakal | पोलिसाच्या अंगावर गाडी घातली अन् ठोकली धूम; येरवड्यातील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

आरोपी हा एका हाताने अपंग आहे. थंडीमुळे हात दुखत असल्यामुळे आपल्या इनोव्हा गाडीमधील हिटरने ऊब घेण्याचा बहाणा करून तो गाडीत शिरला.

पोलिसाच्या अंगावर गाडी घातली अन् ठोकली धूम; येरवड्यातील प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अंदमान न्यायालयाचे अटक वॉरंट असलेल्या एक आरोपी येरवडा पोलिस ठाण्याच्या आवारातून पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून पळून गेला आहे. २६ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपीने त्याच्या इनोव्हा कारमध्ये असलेल्या हिटरवर ऊब घेण्याचा बहाणा करून धूम ठोकली.

शेतकरी आंदोलनाला गालबोट लावणारा दीप सिद्धू आहे तरी कोण?

उत्कर्ष पाटील (रा. नीलांजली सोसायटी, कल्याणीनगर) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस नाईक विनायक उलगा मुधोळकर यांनी तक्रार दिली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी उत्कर्ष पाटील याच्या नावाने अजामीनपात्र गुन्ह्यात अटक वॉरंट जारी केले होते. त्यामुळे त्याला तेथील न्यायालयात हजर करण्यासाठी येरवडा पोलिसांचे कर्मचारी घेऊन आले होते. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार होती. पोलिस ठाण्यात वरिष्ठ कर्मचारी आरोपीला घेऊन जाण्यासंबंधित प्रक्रिया पूर्ण करीत होते.

'केंद्रातील मंत्र्यांनी भालेरावांच्या कविता ऐकाव्यात'; शिक्षणमंत्र्यांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला!

आरोपी हा एका हाताने अपंग आहे. थंडीमुळे हात दुखत असल्यामुळे आपल्या इनोव्हा गाडीमधील हिटरने ऊब घेण्याचा बहाणा करून तो गाडीत शिरला. त्यानंतर त्या ठिकाणी उभे असलेले सहायक पोलिस फौजदार मोरे यांना धक्का देऊन खाली पाडले आणि इनोव्हा गाडी सुरू करून फिर्यादीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करून पळून गेला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image