esakal | 'केंद्रातील मंत्र्यांनी भालेरावांच्या कविता ऐकाव्यात'; शिक्षणमंत्र्यांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला!
sakal

बोलून बातमी शोधा

Varsha_Gaikwad

भालेराव यांनी 'बाप', 'गावाकडे चल माझ्या दोस्ता' अशा कविता सादर करताना शेतकऱ्यांची स्थिती सांगितली. हाच धागा पकडून वर्षा गायकवाड यांनी टीका केली. 

'केंद्रातील मंत्र्यांनी भालेरावांच्या कविता ऐकाव्यात'; शिक्षणमंत्र्यांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने यावरून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या मंत्र्यांना लक्ष्य केले. शेतकऱ्यांची नाळ मातीशी कशी जोडलेली असते हे कळण्यासाठी केंद्रातील काही मंत्र्यांनी इंद्रजित भालेराव यांच्या कविता ऐकल्या पाहिजेत, म्हणजे त्यांना परिस्थितीची जाणीव होईल, अशी टीका गायकवाड यांनी केली. 

बालभारतीचा ५४ वा वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोलत होत्या. शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव, बालभारती नियंत्रक विवेक गोसावी, माजी आमदार उल्हास पवार आदी यावेळी उपस्थित होते. 

शेतकरी आंदोलनाला गालबोट लावणारा दीप सिद्धू आहे तरी कोण?

भालेराव यांनी 'बाप', 'गावाकडे चल माझ्या दोस्ता' अशा कविता सादर करताना शेतकऱ्यांची स्थिती सांगितली. हाच धागा पकडून वर्षा गायकवाड यांनी टीका केली. 

"इंद्रजीत भालेराव यांचे भाषण केंद्रातील लोकांनी ऐकायला हवे होते. शेतकरी, माय, बाप यांची नाळ मातीशी कशी जोडली गेली आहे, हे कवितेतून सांगितले. आपले शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत, अशा स्थितीत शेतकऱ्यांची काय स्थिती आहे, कशी आहे हे सरकारला कळायला पाहिजे,'' असे गायकवाड म्हणाल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image