esakal | Video: 'महाराष्ट्रात दररोज हाथरस घडतोय'; शिरुर प्रकरणावरून दरेकरांची सरकारवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin_Darekar

शिरूर तालुक्‍यातील एका गावामध्ये बुधवारी (ता.६) रात्री नऊ वाजता शौचालयाला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेची अनोळखी व्यक्तीने छेड काढली.​

Video: 'महाराष्ट्रात दररोज हाथरस घडतोय'; शिरुर प्रकरणावरून दरेकरांची सरकारवर टीका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्रात रोजच हाथरस घडतोय, आता कुठे गेले ते हाथरसवरुन बोलणारे. शिरूर येथे एका शेतमजूर महिलेवर अज्ञाताने केलेल्या हल्ल्यासारख्या घटना घडता कामा नयेत, संबंधित प्रकरणातील आरोपीला अजून अटक नाही ही खेदाची बाब आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (ता.६) केली. 

भाजप नेत्यासह कार्यकर्त्यांना अटक; राज्य सरकारचा आदेश धुडकावत काढली यात्रा​

शिरूर तालुक्‍यातील एका गावामध्ये बुधवारी (ता.६) रात्री नऊ वाजता शौचालयाला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेची अनोळखी व्यक्तीने छेड काढली. महिलेने त्यास प्रतिकार केल्यानंतर त्याने जड वस्तूने महिलेच्या तोंडावर घाव घातले. त्यामध्ये महिलेचा एक डोळा बाहेर पडला, तर दुसरा डोळा निकामी झाली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला नागरिकांनी उपचारांसाठी ससून रुग्णालयात आणले. दरम्यान, दरेकर यांनी शुक्रवारी पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

गाडीच्या व्यवहारात फसवलं म्हणून बाप-लेकानं एजंटला केलं किडनॅप!​

राज्य सरकारवर टीकेची झोड उडवीत दरेकर म्हणाले, हाथरससारख्या घटना महाराष्ट्रात दररोज घडत आहेत. आता मात्र त्याविषयी बोलणारे कुठेही दिसत नाहीत. शिरूर तालुक्‍यातील महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणासंबंधी मी राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलणार आहे. या प्रकरणामधील आरोपींना अजूनही अटक झालेली नाही. आरोपींना त्वरित अटक व्हावी, यासाठी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याशी देखील चर्चा करणार आहे. 

सध्याचे सरकार हे भांबावलेले सरकार आहे. कोणालाच कसला मेळ नाही. अकरावी परीक्षेचा गोंधळ सुरू आहे, एक मंत्री एक म्हणतो, तर दुसरा काही वेगळच बोलतो. पुणे जिल्ह्यात अशा घटना घडता कामा नये, पिडीतेच्या कुटुंबीयांना मदतीसाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेही दरेकर यांनी सांगितले. 

पुण्यात आणखी एका ठिकाणी आग; 500 रहिवाशांना सुखरुप बाहेर काढलं

मला फक्त डोळे द्या ! 
बलात्कार पीडित कुटुंबीयांनी ससून रुग्णालयात आक्रोश केला. प्रवीण दरेकर यांनी पिडीतेची आणि कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आरोपीस तत्काळ अटक करून पिडीतेला आवश्‍यक मदत देण्याची मागणी केली. तर 'मला फक्त डोळे द्या, मी सर्व सांगते' अशी मागणी पिडीतेने केली आहे, तिचे डोळे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे दरेकर यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top