esakal | डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींवर आता 15 सप्टेंबरला आरोप निश्चिती
sakal

बोलून बातमी शोधा

dabholkar

डॉ.दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपींवर 15 सप्टेंबरला आरोप निश्चिती

sakal_logo
By
सुनील गाडेकर

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींवर आता 15 सप्टेंबरला आरोप निश्चित करण्यात येणार आहे. आरोपींनी वकील आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी वेळ मागितल्याने आरोपी निश्चिती 15 सप्टेंबरपर्यत पुढे ढकलण्यात आली आहे.

हेही वाचा: Pune : शहराच्या बाजूने होणाऱ्या चक्राकार रिंगरोडला मान्यता

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्‍चिती करण्यात येणार आहे. या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. तावडे, अंदुरे, कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आला आहेत.

तर अॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून अॅड. पुनाळेकर आणि भावे जामीनावर आहेत. न्यायालयाने आरोपींना आजच्या सुनावणी दरम्यान गुन्हा कबूल आहे का? असे विचारले असता कोरोनामुळे नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधता आलेला नाही.

त्यामुळे मुदत मिळण्याची विनंती आरोपींनी केली. ती मान्य करीत न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी 15 सप्टेंबरला आरोपींवर आरोपी निश्चित केले जाईल, असे सांगितले. मात्र आणखी मुदत वाढ देता येणार नाही असही स्पष्ट केले.

loading image
go to top