खेडमधील तरुणीचा खून एकतर्फी प्रेमातून...कपडे बदलल्यामुळे आरोपी जाळ्यात 

crime
crime
Updated on

चाकण (पुणे) : खेड तालुक्यातील करंजविहिरे- थोपटेवाडी येथील सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीच्या खून प्रकरणाला आज वेगळेच वळण मिळाले. नात्यातीलच अल्पवयीन तरुणाने एकतर्फी प्रेमातून तिचा खून केला असल्याची कबुली पोलिस तपासात दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात संशयित म्हणून अटक केलेल्या तिघांना सोडून देण्यात येणार आहे, अशी माहिती चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली. 

करंजविहिरे- थोपटेवाडी येथील सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणी 23 जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास घरातून किराणा साहित्य आणण्यासाठी पायी तीन किलोमीटरवर गेली होती. दुपारी तीनच्या सुमारास तिचे वडिलांशी मोबाईलवरून बोलणे झाले होते. मात्र, त्यांनतर तिचा संपर्क झाला नाही. तसेच, ती घरी आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास तिचा मृतदेह आसखेड खुर्द गावच्या हद्दीत कालव्याजवळील झाडात आढळला. डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आला होता. तसेच, तिच्या अंगावरील कपडे फेकून देण्यात आले होते. या प्रकाराने परिसरात धक्काच बसला होता.  

दरम्यान, गावातील काही तरुणांनी जुन्या काही वादातून हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यातून खूनाच्या तिसऱ्या दिवशी (25 जुलै) तीन संशयितांना अटक केली होती. त्यांना दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मात्र, या तिघांकडून पोलिस तपासात काहीही हाती लागत नव्हते. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान संबंधित तरुणीच्या नात्यातील एक तरुण पोलिसांसोबत घटनास्थळी फिरत होता. तरुणीचा मृतदेह सापडल्याची जागाही त्याने दाखवली होती. पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी तपासाचा मोर्चा त्याच्याकडे वळवला. त्याने खुनाची कबुली दिली आहे. 

या तरुणाने खूनाची कबुली दिल्यामुळे या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण लागले आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार केल्याचे त्याने सांगितले. त्याने खून केल्यानंतर अंघोळ केली होती व कपडे बदलले होते. ही बाब काही लोकांच्या लक्षात आली होते. तसेच, त्या तरुणीशी त्याचे काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. तसेच, तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. अखेर त्याने काल खुनाची कबुली दिली. त्याला आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Marathi News Esakal
www.esakal.com