esakal | हवेली : सत्तावीस लाख रुपये किंमतीचे ब्रेकर चोरणाऱ्या आरोपीस अटक
sakal

बोलून बातमी शोधा

हवेली : सत्तावीस लाख रुपये किंमतीचे ब्रेकर चोरणाऱ्या आरोपीस अटक

लोणीकंद व शिक्रापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून जेसीबी मशिनचे सत्तावीस लाख रुपये किंमतीचे ब्रेकर चोरी करणाऱ्या एका आरोपीला आवळवाडी (ता. हवेली) परिसरातून अटक केली आहे.

हवेली : सत्तावीस लाख रुपये किंमतीचे ब्रेकर चोरणाऱ्या आरोपीस अटक

sakal_logo
By
जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : लोणीकंद व शिक्रापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून जेसीबी मशिनचे सत्तावीस लाख रुपये किंमतीचे ब्रेकर चोरी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी आवळवाडी (ता. हवेली) परिसरातून अटक केली आहे. महादेव अंबादास शेळके (रा. आवळवाडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा - पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जेसीबी मशिनचे ब्रेकर चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरीमकर, पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, अक्षय जावळे यांचे पथक तयार करण्यात आले होते.

सदर गुन्ह्याचा तपास करताना जेसीबी मशिनचे ब्रेकर महादेव अंबादास शेळके याने चोरी केल्याची गुप्त माहिती एका खबऱ्या मार्फत पोलिसांना मिळाली होती. तसेच  महादेव शेळके हा आवळवाडी (ता. हवेली) परिसरात राहत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे लोणीकंद पोलिस ठाण्याचे हवालदार बाळासाहेब सकाटे व हृषीकेश व्यवहारे यांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला अलगद ताब्यात घेतले. ताब्यात घेतले असता आरोपीने जेसीबीचे ब्रेकर चोरी केल्याचे कबूल केले.

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

दरम्यान, आरोपी शेळके यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने लोणीकंद पुणे शहर हाडीतून अशाच प्रकारचे आणखी एक ब्रेकर चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून एकूण सत्तावीस लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)
 

loading image