पुणे : पत्नीचा खुन करुन फरारी झालेल्या आरोपीस अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

पुणे : लातूरमधील औसा येथे चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करुन फरारी असलेल्या आरोपीस पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या यूनिट दोनच्या पथकाने पुण्यातून अटक केली. पाच महिन्यापूर्वी खुनाचा हा प्रकार घडला होता. 

मेहबूब हुसेन मुळजे (वय 25, रा. तुंगी बुदृक, ता. औसा, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सबिया मेहबुब शेख असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबुब व सबियाचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सहा महिन्याने पतीने पत्नीच्या चारित्र्यवर संशय घेन्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याने पत्नीचा गळा चिरुन खुन केला. त्यानंतर तो फरारी झाला होता.

संबंधित आरोपी स्वारगेट परिसरातील कैफे आयडीयलमध्ये काम करत असल्याची खबर सहाय्यक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव व पोलिस कर्मचारी दिनेश गडांकुश यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संबंधित हॉटेलमध्ये सापळा रचून आरोपीस अटक केली.

Web Title: The accused who had been murdered his the wife and absconding were arrested