esakal | एक वर्षापासून पोलिसांना देत होता गुंगारा, गुन्हे शाखेच्या युनीटने...
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Crime

किरण शिंदे याने सिंहगड रस्ता परिसरातील फनटाईम मॉल येथे एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला होता. या प्रकरणामध्ये त्यास जामीन मिळाला होता.

एक वर्षापासून पोलिसांना देत होता गुंगारा, गुन्हे शाखेच्या युनीटने...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : खून, खुनाच्या प्रयत्नासह विविध प्रकारचे गुन्हे करून एक वर्षापासून फरारी झालेल्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपीने मागील वर्षी सिंहगड रस्ता परिसरात एका तरुणावर कोयत्याने वार करून खून केला होता. किरण विठ्ठल शिंदे (वय १८, रा. नऱ्हे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाबद्दल घेतला मोठा निर्णय; गणेश मंडळांना केले 'हे' आवाहन!​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण शिंदे याने सिंहगड रस्ता परिसरातील फनटाईम मॉल येथे एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला होता. या प्रकरणामध्ये त्यास जामीन मिळाला होता. दरम्यान, किरण शिंदे, बंटी पवार आणि त्यांच्या साथीदारांनी चेतन पांडुरंग ढेबे (रा.हिंगणे) याच्यावर शिंदे याच्या विरोधातील लोकांसमवेत फिरत असल्याच्या कारणावरून ऑगस्ट २०१९ मध्ये कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात एका आरोपीस पोलिसांनी अटक केली. मात्र किरण शिंदे हा एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता.  

परदेशी बनावटीच्या सिगारेट विक्री करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या; लाखांचा मुद्देमाल जप्त​

या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, किरण शिंदे हा आंबेगाव येथील दत्तनगर चौकात एका चहाच्या टपरीवर मित्रांसोबत गप्पा मारत थांबला असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकातील पोलिस कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. त्यानुसार पवार आणि त्यांच्या पथकाने आरोपीस तत्काळ अटक केली. आरोपीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, पिस्तुल बाळगणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top